समाजकल्याणचे अधिकारी केवळ सत्कारासाठी आले होते का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST2021-02-05T06:38:12+5:302021-02-05T06:38:12+5:30
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शेंडगे यांनी म्हटले आहे की, श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुकमध्ये दलित वस्तीमध्ये शौचालय बांधण्यासाठी निधी मंजूर झाला ...

समाजकल्याणचे अधिकारी केवळ सत्कारासाठी आले होते का?
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शेंडगे यांनी म्हटले आहे की, श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुकमध्ये दलित वस्तीमध्ये शौचालय बांधण्यासाठी निधी मंजूर झाला होता. मात्र, दलित वस्तीमध्ये शौचालय बांधण्यात आले नाही याबाबत ग्रामपंचायतीमध्ये तक्रार केली; परंतु त्याची दखल न घेतल्याने जिल्हा परिषदेत तक्रार केली. त्यानुसार २८ रोजी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे अधिकारी निमसे व कोकाटे तसेच पंचायत समिती श्रीरामपूर विस्तार अधिकारी चर्हाटे यांनी समक्ष पाहणी केली; परंतु याची माहिती उपसरपंच व इतर सदस्यांना देण्यात आली नाही. पाहणी केल्यानंतर सरपंचाचे पती व तीन सदस्यांनी आलेल्या अधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यामुळे हे अधिकारी पाहणी करण्यासाठी आले होते की हारतुरे घेण्यासाठी आले होते, असा आरोपही शेंडगे यांनी केला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अन्यथा राज्यपाल भवनासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे शेंडगे यांनी म्हटले आहे.