नामदार चषक धनगरवाडी संघाने पटकाविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:21 IST2021-03-06T04:21:14+5:302021-03-06T04:21:14+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील इमामपूर येथील नामदार चषक धनगरवाडी येथील राजमाता क्रिकेट संघाने पटकावला. इमामपूर येथे नामदार प्राजक्त तनपुरे ...

नामदार चषक धनगरवाडी संघाने पटकाविला
केडगाव : नगर तालुक्यातील इमामपूर येथील नामदार चषक धनगरवाडी येथील राजमाता क्रिकेट संघाने पटकावला.
इमामपूर येथे नामदार प्राजक्त तनपुरे चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामना राजमाता क्रिकेट संघ धनगरवाडीविरुद्ध इमामपूर क्रिकेट क्लब दरम्यान झाला. धनगरवाडी संघाने हा सामना दहा विकेटने जिंकला.
प्रथम पारितोषिक ३१ हजार रुपये राजमाता क्रिकेट संघ धनगरवाडी, द्वितीय पारितोषिक २१ हजार रुपये, इमामपूर क्रिकेट क्लब, तृतीय पारितोषिक ११ हजार रुपये पिंपळगाव माळवी संघाने मिळविले.
बक्षीस वितरण सरपंच भीमराज मोकाटे, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव आवारे यांच्या हस्ते करण्यात आले. आयोजक संतोष आवारे, अक्षय मोकाटे, अमोल मते, फिरोज शेख, सोमनाथ तोडमल, आबा कदम आदी उपस्थित होते.