धनगर समाज रस्त्यावर

By Admin | Updated: July 31, 2014 00:40 IST2014-07-30T23:35:08+5:302014-07-31T00:40:44+5:30

श्रीरामपूर: धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी बुधवारी श्रीरामपूरच्या गांधी पुतळ्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

Dhangar society on the streets | धनगर समाज रस्त्यावर

धनगर समाज रस्त्यावर

श्रीरामपूर: धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी बुधवारी श्रीरामपूरच्या गांधी पुतळ्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. येळकोट येळकोट जय मल्हारचा नारा देत धनगर बांधवांनी श्रीरामपूरमधून शेळी मेंढ्यांसह काठी न् घोंगडं घेऊन फेरी मारली.
मल्हार सेनेचे तालुका संघटक राजेंद्र पानसरे यांच्या नेतृत्वाखाली हे शहरातून फेरी मारल्यानंतर गांधी पुतळ्यासमोर धनगर बांधव उपोषणास बसले. बापू वडितके यांनी प्रास्ताविक केले. नगरसेविका मंजुश्री मुरकुटे, पं.स. सदस्य वंदना राऊत, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, माजी सभापती इंद्रनाथ थोरात, सुनीता गायकवाड, माजी जि. प. सदस्य मिलिंद गायकवाड, अशोक बँकेचे उपाध्यक्ष किशोर फोफळे, भाजपचे तालुकाध्यक्ष बबनराव मुठे, जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र देवकर, भाऊसाहेब डोळस, राजेंद्र पवार, लहू कानडे, नामदेवराव देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पाटील, सिद्धार्थ मुरकुटे, माजी नगरसेवक नजीर मुलानी, भारतीय धनगर महासंघाचे बबनराव कांदळकर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खेमनर, दत्तात्रय कांदे उपस्थित होते.
पानसरे यांच्यासह ज्ञानेश्वर राऊत, अण्णा कांदळकर, विलास गोराणे, सुनील बंड, माजी उपसभापती सोपान राऊत, संजय राऊत, राजेंद्र पवार, शरद देवकर, भाऊराव सुडके , रामदास पवार, विजय पिसे, राजेंद्र तागड आदी उपोषणास बसले होते.
शिर्डी : धनगर समाजाला आरक्षण देऊन अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी राहाता तालुक्यातील धनगर समाजाच्या तरुणांनी बुधवारी शिर्डीत नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले़ यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी या आरक्षणाला विरोध करणारे आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचेही दहन केले़
सध्या सुरू असलेल्या आंदोलनानंतरही सरकारने आरक्षणाच्या रूपाने आमचा हक्क आम्हाला दिला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला़ ज्ञानेश्वर सोडणार, दिलीप सातव, प्रदीप रानभोंडे, बाळासाहेब गिधाड, अंकुश भडांगे आदी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते़
दिलीप सातव यांनी सांगितले की,घटनाकार डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांनीही उदरनिर्वाहासाठी दर्याखोऱ्यात भटकंती करणाऱ्या धनगर समाजाचा आदीवासी समावेश करण्याचे निर्देश तत्कालीन सरकारला दिले होते़मात्र यासाठी सातत्याने प्रयत्न करूनही आजवर अंमलबजावणी झाली नाही़
शिर्डीच्या नगराध्यक्षा अनिता जगताप, भाजपाचे शहराध्यक्ष राजेंद्र गोंदकर आदींनी आंदोलनात सहभागी होवुन धनगर समाजाच्या मागणीचे समर्थन केले़रास्तारोको नंतर पोलीस निघून गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी पिचड यांच्या पुतळ्याचे दहन केले व पद्मकांत वळवी व वसंतराव पुरके यांचाही निषेध केला. आंदोलनासाठी मेढ्यांही आणण्यात आल्या होत्या़
पिचडांचा निषेध
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यास आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी विनाकारण विरोध दर्शवून आमच्या समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे पिचड यांचाही आम्ही निषेध करीत आहोत. सरकारने या प्रवर्गात समावेश न केल्यास राज्यातील आघाडी सरकारविरोधात मतदान करण्याची शपथही यावेळी आम्ही उपोषणकर्त्यांनी व समाजबांधवांनी घेतली.
- राजेंद्र पानसरे, तालुका संघटक, मल्हार सेना, श्रीरामपूर.

Web Title: Dhangar society on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.