शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणाचा विषय अभ्यासपूर्ण मांडायला हवा : सुमित्रा महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 19:18 IST

पुण्यश्लोक अहिल्यादेवी या उत्तम प्रशासक होत्या. त्यांच्या जीवनातील एकतारी गुण आपण जीवनात अंगिकारला पाहिजे. धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय अभ्यासपूर्ण मांडायला हवा त्यानंतर तो लोकसभेत बहुमताने संमत झाल्यानंतरच हा प्रश्न सुटू शकेल. ज्या मल्हारराव होळकरांचे व आहिल्यादेवींची आपण नाव घेतो त्यांच्या विचाराचे रक्षण करूनच आरक्षण मागितले पाहिजे' असे मत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले.

जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी या उत्तम प्रशासक होत्या. त्यांच्या जीवनातील एकतारी गुण आपण जीवनात अंगिकारला पाहिजे. धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय अभ्यासपूर्ण मांडायला हवा त्यानंतर तो लोकसभेत बहुमताने संमत झाल्यानंतरच हा प्रश्न सुटू शकेल. ज्या मल्हारराव होळकरांचे व आहिल्यादेवींची आपण नाव घेतो त्यांच्या विचाराचे रक्षण करूनच आरक्षण मागितले पाहिजे' असे मत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आज पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा २९३ वा जयंती महोत्सव साजरा झाला. यावेळी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री गणपतराव देशमुख होते.महाजन म्हणाल्या, अहिल्यादेवींच्या जीवनातील एक तरी गुण आदर्श मानून प्रत्येकाने जीवन जगले पाहिजे. अहिल्यादेवींनी आपल्या जीवनात सुखा पेक्षा दु:ख च जास्त पहिले तरी त्या कर्तव्य करीत राहिल्या. आमच्या मवाळ प्रांतात त्यांना सर्व जातीधर्माचे लोक आई मानतात. तुमच्या तालुक्यातील जन्मलेली एक मुलगी ही इंदोरची सुभेदारीन झाली. इंग्रजांनाही आपल्या मुठीत ठेऊन जगासमोर एक दीपस्तंभ म्हणून उभी राहिली.स्वागताध्यक्ष पालकमंत्री राम शिंदे म्हणाले, चौंडी मध्ये विकास कामे मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. समाजाचे अनेक प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे. जामखेड तालुक्यातील हाळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शासकीय कृषी महाविद्यालय सुरू होणार आहे. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव देणार असून त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आरक्षण विधेयकाची प्रकीया सुरू असुन शासन प्रयत्नशील आहे, असा विश्वास शिंदे यांनी दिला.यावेळी पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री अण्णा डांगे, खासदार विकास महात्मे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, नारायण पाटील, दत्तात्रय भरणे, रामहारी रूपनवर, नारायण कुचे, आमदार भीमराव धोंडे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, नानासाहेब पाटील, रमेश शेंडगे, पोपट गावडे उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडRam Shindeराम शिंदेSumitra Mahajanसुमित्रा महाजन