ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ढाकणे
By Admin | Updated: June 29, 2016 00:50 IST2016-06-29T00:39:48+5:302016-06-29T00:50:59+5:30
अहमदनगर : ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सलग सहाव्यांदा एकनाथ ढाकणे यांची निवड झाली आहे. २५ वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून

ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ढाकणे
अहमदनगर : ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सलग सहाव्यांदा एकनाथ ढाकणे यांची निवड झाली आहे. २५ वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून ग्रामसेवकांचे प्रश्न सोडवत असल्याने ग्रामसेवकांनी ढाकणे यांना पुन्हा काम करण्याची संधी दिली आहे. रविवारी ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी बैठक बोलवण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी बी. वाय. कडू होते. यावेळी ढाकणे यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
जिल्हा सचिवपदी अशोक नरसाळे, जिल्हा कार्याध्यक्ष (उत्तर) युवराज ढेरे, गंगाधर राऊत (दक्षिण) यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा कार्यकारिणीत एम. के . दहिफळे, बाळासाहेब गागरे, अंकुश वेताळ, अहमद शेख, भाऊसाहेब सावंत, तिलोत्तम रोकडे, राणी वाघ, एल. डी. नागरे, रवींद्र मेहेत्रे, संजय मिसाळ यांचा समावेश आहे. ग्रामसेवकांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. असे ढाकणे यांनी निवडीनंतर सांगितले़ बैठकीला राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे, उद्धव फडतरे, दीपक दौंड हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते.