अमेरिकेतील भाविक समजावून घेणार मेहेरबाबांचे जीवनचरित्र; २०० भाविकांचा समुह नगरमध्ये दाखल
By अरुण वाघमोडे | Updated: November 22, 2023 15:05 IST2023-11-22T15:04:46+5:302023-11-22T15:05:50+5:30
मेहेरबाबा केंद्राच्यावतीने सांगण्यात आले.

अमेरिकेतील भाविक समजावून घेणार मेहेरबाबांचे जीवनचरित्र; २०० भाविकांचा समुह नगरमध्ये दाखल
अरुण वाघमोडे, अहमदनगर: अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को, वाशिंग्टन डी. सी. येथील २०० सुफी भक्त नगर तालुक्यातील मेहेराबाद येथे मेहेरबाबांच्या समाधीस्थळी दाखल झाले आहेत. हे भाविक मेहेरबाबांचे जीवनचरित्र समाजावून घेणार असल्याचे मेहेरबाबा केंद्राच्यावतीने सांगण्यात आले.
अमेरिकेतील भाविक २० नोव्हेंबर रोजी पुणे येथे दाखल झाले तेथे त्यांनी मेहेरबाबांचे जन्मस्थान असलेल्या ससून रुग्णालयातील रूमला भेट दिली तसेच बाबांचे निवासस्थान व पुणे सेंटरलाही भेट देऊन दुसऱ्या दिवशी मेहेराबादला दाखल झाले. यावेळी डॉ. मेहरनाथ कलचुरी, राज कलचुरी, जेनेस रेमन, जायना टॉमकीन व नगर सेंटरचे कार्यकर्ते यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच बाबांचे जीवनकार्य व केंद्राबाबत त्यांना माहिती दिली. यावेळी डॉ. कलचुरी यांनी सांगितले की, मेहरबाबांनी जगभरात भ्रमंती केली. नंतर त्यांनी पुढील कार्यासाठी अहमदनगरची भूमी निवडली व येथेच स्थिरावले ते नगरजवळील वांबोरी रोडवरील पिपळगाव माळवी येथील आश्रमात स्थायिक झाले.
त्यांची समाधी अरणगाव येथे मेहेरबाद येथे आहे. मेहेरबाबांचे भक्त आज भारतातच नव्हे तर परदेशातही आहेत. बाबा सर्व धर्मावर प्रेम व सर्व धर्माची पूजा करत असे. परंतु आपण कोणत्याच धर्माचे नाही किंवा कोणता नवीन धर्म स्थापन करुन मानवाला मानवा पासून वेगवेगळे करुन त्यांच्यात भ्रम वाढवु इच्छित नाही, असे ते सांगायचे.