रस्ते खराब झाल्याने देवळाली प्रवरा ग्रामस्थांनी रोखली वाळू वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 19:25 IST2018-06-06T19:25:19+5:302018-06-06T19:25:26+5:30
देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील रस्त्यावरुन वाळू वाहतूक केली जात असल्याने शहरातील रस्ते खराब होत आहेत. जातप व करजगाव नदीपात्रातील वाळू वाहतुकीच्या मालमोटारी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह नागरिकांनी बुधवारी सकाळी लाख रस्ता येथे अडवून वाळू वाहतूक रोखली.

रस्ते खराब झाल्याने देवळाली प्रवरा ग्रामस्थांनी रोखली वाळू वाहतूक
देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील रस्त्यावरुन वाळू वाहतूक केली जात असल्याने शहरातील रस्ते खराब होत आहेत. जातप व करजगाव नदीपात्रातील वाळू वाहतुकीच्या मालमोटारी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह नागरिकांनी बुधवारी सकाळी लाख रस्ता येथे अडवून वाळू वाहतूक रोखली.देवळाली प्रवरा हद्दीतून करण्यात येऊ नये, ही वाहतूक बंद करण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे. वाळू वाहतूक सुरु राहिल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नागरिकांच्या वतीने नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिला.
नगराध्यक्ष कदम यांच्यासह नागरिकांनी वाळू वाहतुकीची वाहने अडविल्यानंतर महसूल व पोलिस खात्याची धावपळ उडाली. काही काळासाठी मोठी पोलीस गाडीसह मोठा पोलीस फौजफाटा देवळालीत दाखल झाला होता. अडवलेली वाहने आहे त्याच मार्गाने निघून गेली. महसूल खात्याचे कामगार तलाठी जालिंदर पाखरे यांनी भेट देऊन नागरिकांचे निवेदन स्वीकारले. वाळू वाहतुकीस पर्यायी रस्ता वापरण्यास सांगण्यात येईल, असे आश्वासन पाखरे यांनी नागरिकांना दिले.
यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, नगरसेवक सचिन ढुस, भारत शेटे, आदिनाथ कराळे, अमोल कदम, शिवाजी मुसमाडे, सुधीर टिक्कल, संदीप कदम, राजेंद्र कदम, सूर्यकांत कदम, अतुल कदम, मंजाबापू वाळुंज, भाऊसाहेब वाळुंज, सचिन सांबारे, भाऊसाहेब गडाख, अमोल वाळुंज, रितेश कदम, रमेश वाळुंज, सागर गडाख, विलास वाळुंज, बाळासाहेब कदम, युनूस शेख, भाऊसाहेब पंडित, प्रकाश कदम, किशोर गडाख, भाऊसाहेब कदम, मंजाबापू कदम, हुसेन शेख, सचिन कदम, मंगेश ढुस, ऋषिकेश उंडे, संदीप कदम, अक्षय कदम, संदीप गडाख, शशिकांत मुसमाडे आदिसह परिसरातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते.