१० कोटीचा विकास आराखडा
By Admin | Updated: July 14, 2014 00:58 IST2014-07-14T00:32:23+5:302014-07-14T00:58:39+5:30
अहमदनगर : मांजरसुंबा (ता. नगर) येथील गोरक्षनाथ गडाचा १० कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

१० कोटीचा विकास आराखडा
अहमदनगर : मांजरसुंबा (ता. नगर) येथील गोरक्षनाथ गडाचा १० कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्याचे अनावरण भाविक भक्तांच्या माहितीसाठी करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे सचिव गोरक्षनाथ कदम यांनी दिले.
या विकास आराखड्यात ध्यान मंदिर, दर्शन बारी, भक्त निवास, उद्यान, पार्र्कींग, मुख्य रस्ता, स्वागत कमान, व्यापारी संकूल आदींचा समावेश आहे. धार्मिक बरोबरच पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या गर्भगिरीच्या डोंगर रांगातील हे मंदिर पुरातन आहे., त्याचे नवीन दगडी मंदिराचे काम पूर्ण होत आले आहे. शासनाच्या निधीतून प्रसादालय, पाणी योजना, सुशोभिकरण तसेच भक्ताच्या देणगीतून मंदिराचे काम चालू आहे.
मांजरसुंबापासून गडाकडे जाणारा एक किलोमीटरचा रस्ता आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निधीतून झाला असून, उर्वरित ३ कि.मी. रस्ता खा.दिलीप गांधी यांनी त्यांच्या निधीतून करून द्यावा, अशी भाविकांची मागणी आहे.
मंदिर व गडाच्या कामासाठी देणगी द्यावयाची असल्यास संबंधीतांनी गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्ट, मांजरसुंबा येथे संपर्क साधावा, असे आवाहन सरपंच जालींदर कदम, अध्यक्ष अॅड. शंकरराव कदम, सर्व विश्वस्त व भाविकांनी केले आहे.
(प्रतिनिधी)