दीड हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:16 IST2021-06-06T04:16:34+5:302021-06-06T04:16:34+5:30
यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे, उद्योजक कोंडीभाऊ फलके, वनरक्षक अफसर पठाण, भाऊसाहेब फलके, मयूर ...

दीड हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प
यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे, उद्योजक कोंडीभाऊ फलके, वनरक्षक अफसर पठाण, भाऊसाहेब फलके, मयूर काळे, चंद्रकांत जाधव, पै.संदिप डोंगरे, प्रतिभा डोंगरे, संतोष रोहोकले आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डोंगरे म्हणाले वृक्षारोपण मोहीम ही सामाजिक चळवळ म्हणून पुढे येण्याची गरज आहे. समाजात पर्यावरणसंबंधी जागृती होत असताना पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय आहे. साहेबराव बोडखे म्हणाले, कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजनची कमतरता भासल्याने झाडांचे महत्त्व पटले. रस्त्यांच्या दुतर्फा झाडांमुळे रस्ता शोभून दिसतो तर पर्यावरणाचा समतोल देखील साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोंडीभाऊ फलके यांनी नैतिक जबाबदारी म्हणून वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.
............
ओळी-
निमगाव वाघा येथे डोंगरे बहुउद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने गावात दीड हजार झाडे लावण्याच्या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.