रिमझिम पावसात ‘सर्वोदय’च्या गणरायाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 14:41 IST2017-08-29T14:40:44+5:302017-08-29T14:41:39+5:30
राजूर : रिमझिम पावसाच्या सरी अंगावर झेलत, ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत, पदलालित्याचा आविष्कार घडवित पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध पथकांच्या अदाकारींने मंगळवारी राजूरकरांची मने जिकंली. उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात राजूर (ता. अकोले) येथील गुरूवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्यालयाने गणरायाला निरोप दिला.

रिमझिम पावसात ‘सर्वोदय’च्या गणरायाला निरोप
ठळक मुद्देशिस्तबद्ध मिरवणूक अदाकारीने राजूरकरांची मने जिंकली
र जूर : रिमझिम पावसाच्या सरी अंगावर झेलत, ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत, पदलालित्याचा आविष्कार घडवित पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध पथकांच्या अदाकारींने मंगळवारी राजूरकरांची मने जिकंली. उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात राजूर (ता. अकोले) येथील गुरूवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्यालयाने गणरायाला निरोप दिला.परिसरातील सर्वात मोठे विद्यालय म्हणून या विद्यालयाकडे पाहिले जाते. त्यामुळेच या विद्यालयाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीकडेही राजूरकरांचे लक्ष लागलेले असते. यावर्षी विद्यालयाच्या दोन्ही विभागांतील विद्यार्थ्यांनी लेझीम, टिपरी, झांज पपथकांची नृत्ये बसविली होती. प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य एल. पी. पर्बत, पर्यवेक्षक ए. जी. सावंत व कार्यक्रमप्रमुख बाळासाहेब घिगे,आर. पी. पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक विद्यालय-आमदार निवास-महादेव मंदिर मार्गे बाजारपेठेच्या मुख्य चौकात आली. यावेळी पावसाची रिमझिम थांबली होती. आपल्या पाल्यांची अदाकारी पाहण्यासाठी पालकांबरोबरच राजूरकरांनी गर्दी केली. याठिकाणी विद्यार्थ्यांनी अध्यापक एन. एम. आभाळे, बी. व्ही. भोसले, बी. के. बनकर,जे. आर. आरोटे, वंदना सोनवणे, रिना चव्हाण,सुरेश शेटे, संतराम बारवकर आदींच्या मार्गदर्शनाखाली लेझीम, टिपरी व झांज पथकांनी नृत्ये सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळविली. बाजापेठेतून पुढे मिरवणूक सरकत होती, तसतसा विद्यार्थी कलाकारांमध्ये जोश संचारत होता. सुमारे पाच तास चाललेल्या या मिरवणुकीत सर्वच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होते. त्यामुळे शिस्तप्रिय वातावरणात कुठलाही अनुचित प्रकार न घडता निर्विघ्नपणे जल्लोषात विद्यालयाने भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अशोक उजगिरे व पोलीस कर्मचाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.