पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST2021-08-15T04:23:39+5:302021-08-15T04:23:39+5:30

पारनेर : पारनेर तालुक्यातील वडझिरे गावचे सुपुत्र व ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती शौर्य पदक ...

Deputy Superintendent of Police Navnath Dhawale awarded President's Medal | पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती पदक

पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती पदक

पारनेर : पारनेर तालुक्यातील वडझिरे गावचे सुपुत्र व ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कामगिरीबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे.

नवनाथ ढवळे २०१५-१७ या काळात गडचिरोली जिल्हा पोलीस दलात ऑपरेशन उपविभागीय पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात अनेक मोहिमा यशस्वी केल्या. त्यातील मे २०१६ मध्ये धानोरा उपविभागातील चातगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील हुर्रेकसा जंगल परिसरात नवनाथ ढवळे यांनी व त्यांच्या टीमने नक्षली रजिता उसेंडी आणि तिच्यासोबत सहा वरिष्ठ नक्षलींचा खात्मा केला होता. ही चकमक तब्बल १२ तास सुरू होती.

ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिवाची बाजी लावत ही कामगिरी केली होती. या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले. ढवळे यांनी गडचिरोली, कऱ्हाड, चिपळूण याठिकाणी पोलीस उपअधीक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे पोलीस उपअधीक्षक आहेत. कोरोना काळात त्यांनी केलेले कामही लक्षवेधी ठरले आहे.

Web Title: Deputy Superintendent of Police Navnath Dhawale awarded President's Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.