अतिक्रमण काढल्याच्या रागातून उपमुख्याधिकाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:25+5:302021-07-23T04:14:25+5:30

याप्रकरणी सुनील भाऊसाहेब गोर्डे ( वय ४०, रा. अस्तगाव ता. राहाता ) यांच्या फिर्यादीवरून सनी रमेश वाघ, योगेश तुळीदास ...

Deputy Chief Minister beaten up in anger over encroachment | अतिक्रमण काढल्याच्या रागातून उपमुख्याधिकाऱ्यांना मारहाण

अतिक्रमण काढल्याच्या रागातून उपमुख्याधिकाऱ्यांना मारहाण

याप्रकरणी सुनील भाऊसाहेब गोर्डे ( वय ४०, रा. अस्तगाव ता. राहाता ) यांच्या फिर्यादीवरून सनी रमेश वाघ, योगेश तुळीदास बागुल, कैलास द्वारकानाथ जाधव, बालाजी पंढरीनाथ गोर्डे, साई पंढरीनाथ गोर्डे, नीलेश पंढरीनाथ गोर्डे, आशिष निकुंब (रा. कोपरगाव) यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी (दि. २१) रात्री ९ वाजेच्या सुमारास कोपरगाव नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे हे आपल्या पथकास कोपरगाव शहरातील अतिक्रम केलेल्या टपऱ्या हटविण्याची कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान सनी वाघ, बालाजी गोर्डे, साई गोर्डे, नीलेश गोर्डे यांनी गोर्डे यांना दमदाटी केली. गुरुवारी ( दि. २२ ) सकाळी ११ वाजता कार्यालयात येऊन बांधकाम अभियंता डिंगबर वाघ यांच्या टेबलवरील काचा फोडल्या, संगणक जमिनीवर फेकला, खुर्ची जमिनीवर फेकली. उपमुख्याधिकारी गोर्डे यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर गोर्डे यांना मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे करीत आहेत.

Web Title: Deputy Chief Minister beaten up in anger over encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.