पाथर्डीत भूमिगत गटार कामांची चौकशी

By Admin | Updated: April 27, 2017 14:54 IST2017-04-27T14:54:25+5:302017-04-27T14:54:25+5:30

शहरातील भूमिगत गटार योजनेतून झालेल्या गटार कामाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत़

In-depth investigations into underground sewer operations in Pathardi | पाथर्डीत भूमिगत गटार कामांची चौकशी

पाथर्डीत भूमिगत गटार कामांची चौकशी

नलाइन लोकमतपाथर्डी (अहमदनगर), दि़ २७ -शहरातील भूमिगत गटार योजनेतून झालेल्या गटार कामाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत़ या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मनसे व आपच्या कार्यकर्त्यांनी केली होती़शहरात झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्यामुळे नगरपालिकेने या कामांवर खर्च केलेला निधी वाया गेला आहे़ या कामातील अनियमिततेला पालिका मुख्याधिकारी, अभियंता व ठेकेदार हे जबाबदार असून या सर्व कामांची उच्चस्तरीय गुणनियंत्रक समिती मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आम आदमी पक्षाच्या वतीने तहसिदार व नगरपालिका जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून करण्यात आले. दोन्ही पक्षाच्या वतीने केलेल्या आंदोलनाच्या व निवेदनाच्या अनुशंगाने जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस यांनी या कामांची प्रांताधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: In-depth investigations into underground sewer operations in Pathardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.