शेतकर्‍यांचे ५ कोटी बँक खात्यावर जमा

By Admin | Updated: October 22, 2015 21:15 IST2015-10-22T21:15:11+5:302015-10-22T21:15:11+5:30

खुर्ची जप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कवडे दोन दिवस दालानाकडे फिरकले नाहीत. तिसर्‍या दिवशी बुधवारी कवडे यांना बसण्यासाठी दुसरी खुर्ची ठेवण्यात आली.

Deposits of 5 crore bank accounts of farmers | शेतकर्‍यांचे ५ कोटी बँक खात्यावर जमा

शेतकर्‍यांचे ५ कोटी बँक खात्यावर जमा

 खुर्ची जप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कवडे दोन दिवस दालानाकडे फिरकले नाहीत. तिसर्‍या दिवशी बुधवारी कवडे यांना बसण्यासाठी दुसरी खुर्ची ठेवण्यात आली. दुपारनंतर कवडे यांनी दुसर्‍या खुर्चीवर बसून कामाला सुरुवात केली. न्यायालयाने जप्त केलेली खुर्ची कोपरगाव न्यायालयात जमा करण्यात आली असून, कवडे यांना दुसरी खुर्ची देण्यात आली आहे. अहमदनगर : जिल्हाधिकार्‍यांची खुर्ची जप्त केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला खडबडून जाग आली. शिर्डी विमानतळासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा वाढीव पाच कोटी रुपयांचा मोबदला उपविभागीय कार्यालयाच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यावर बुधवारी जमा करण्यात आला असून, कोपरगाव न्यायालयामार्फत ते शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या न्यायालयीन लढाईला अखेर यश आले. 
कोपरगाव न्यायालयाच्या आदेशाने सोमवारी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची खुर्ची जप्त करण्यात आली. न्यायाधीश व्हि. एल. पाटील यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. सलग दुसर्‍या दिवशी मंगळवारीही संगणक जप्तीची कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांच्या खुर्चीसह संगणक जप्तीच्या कारवाईने प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. न्यायालयाच्या या दणक्याने मंत्रालयातील यंत्रणाही हालली. काकडी येथील ४९ शेतकर्‍यांना वाढीव दराने ७ कोटी ४९ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव गेल्या काही दिवसांपासून धूळखात पडून होता. त्यावरील धूळ झटकली. मंत्रालयातून चक्रे फिरली आणि काकडी येथील शेतकर्‍यांना अखेर न्याय मिळाला. शेतकर्‍यांच्या ७ कोटी ४९ लाखांपैकी ५ कोटी रुपये शिर्डी उपविभागीय कार्यालयाच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. तसे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास सायंकाळी प्राप्त झाले. उपविभागीय कार्यालयाकडून ही रक्कम कोपरगाव न्यायालयात जमा केली जाणार आहे. (पान १0 वर) शेतकर्‍यांचे'लोकमत'ला धन्यवाद
■ गेल्या अनेक दिवसांपासून विमानतळासाठी काकडी येथील शेतकर्‍यांचा वाढीव मोबदल्यासाठी लढा सुरू आहे. या लढय़ात 'लोकमत' ने साथ दिली. त्यामुळेच या लढय़ाला यश आल्याचे सांगून काकडी येथील चंद्रभान गुंजाळ यांच्यासह शेतकर्‍यांनी 'लोकमत'ला धन्यवाद दिले.

Web Title: Deposits of 5 crore bank accounts of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.