विविध पक्षांच्या २१ उमेदवारांची अनामत जप्त
By Admin | Updated: October 21, 2014 00:58 IST2014-10-21T00:36:59+5:302014-10-21T00:58:50+5:30
अहमदनगर: नुकत्याचा झालेल्या विधानसभा निवडणूकीत शहर मतदारसंघातील युवक काँग्रेसचे उमेदवार तथा युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यासह

विविध पक्षांच्या २१ उमेदवारांची अनामत जप्त
अहमदनगर: नुकत्याचा झालेल्या विधानसभा निवडणूकीत शहर मतदारसंघातील युवक काँग्रेसचे उमेदवार तथा युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यासह जिल्ह्यातील २१ उमेदवारांना वैधानिक मतांच्या षष्टांश मते न मिळाल्याने त्यांची अनामत सरकार जमा होणार आहे़
यात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांचाच यात समावेश असून, सर्वाधिक उमेदवार काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचे आहेत़ तर मनसेच्या तिन्हीही उमेदवारांचा यात समावेश आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला़ मतदारसंघनिहाय विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून, उमेदवार व त्यांना पडलेल्या मतांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे़ प्रशासनाच्या अहवालानुसार शहरासह जिल्ह्यातील २१ उमेदवारांना वैधानिक मतांच्या एक षष्टांशपेक्षाही कमी मते मिळाली आहेत़ आघाडी व महायुतीच्या फाटाफुटीमुळे चारही प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते़
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या पक्षांना ऐनवेळी सक्षम उमेदवार न मिळाल्याने मिळेल त्याला उमेदवारी देऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्यात आले़ काही ठिकाणी बाहेरचे उमेदवार दिले गेले़ तसेच अनेकांनी बड्या नेत्यांना आव्हान देत निवडणुकीत उडी घेतली खरी, पण त्यांची अनामत रक्कम जमा झाली आहे़
अनामत रक्कम जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये सर्वच पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे़ यापूर्वीच्या निवडणूकांमध्ये प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची अनाम जप्त होणे होणे ही शरमेची बाब समजली जात. मात्र, आता कोणालाच कशाचे घेणे-देणे नसल्याचे चित्र आहे. मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पाथर्डी येथे सभा घेतली़ तरीही मनसे उमेदवारांना अनामतही वाचविता आली नाही.
(प्रतिनिधी)