संत निळोबाराय महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:18+5:302021-07-20T04:16:18+5:30
जवळे : जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र पिंपळनेर (ता. पारनेर) येथील संत निळोबाराय महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पादुकांसह ...

संत निळोबाराय महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
जवळे : जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र पिंपळनेर (ता. पारनेर) येथील संत निळोबाराय महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पादुकांसह मोजक्याच भाविकांसह दोन शिवशाही बसने पंढरपूरकडे सोमवारी सकाळी दहा वाजता प्रस्थान झाले. यावेळी उपस्थितांनी एकोबा तुकोबा निळोबाचा नामघोष केला. या नामघोषाने पिंपळनेर दुमदुमले.
सकाळी डॉ. विकासानंद मिसाळ महाराज यांचे कीर्तन झाले. सकाळी संजीवनी समाधी, पादुका पूजन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, तहसीलदार ज्योती देवरे, जिल्हा परिषद सदस्या राणी लंके, प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या हस्ते झाले.
यावेळी निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानदेव पठारे, कार्याध्यक्ष अशोक सावंत, निळोबाराय महाराज पालखीचे प्रमुख वंशज गोपाळ काका मकाशीर, सुरेश ज्ञानदेव पठारे, सरपंच सुभाष गाजरे, निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे सचिव लक्ष्मण खामकर, निळोबाराय सेवाभावी संस्था सचिव चांगदेव शिर्के, विणेकरी पांडुरंग रासकर, भाऊसाहेब लटांबळे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गाडे, शिरूरचे नगरसेवक नीलेश लटांबळे, देवेंद्र लटांबळे आदी उपस्थित होते.
यंदाही कोराेनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत निळोबारायांच्या पादुकांसह पालखी सोहळा बसनेच नेण्याचे नियोजन करण्यात आले. यंदा या सोहळ्यासाठी दोन शिवशाही बस प्रशासनाकडून देण्यात आल्या. त्या बसेस रविवारी सायंकाळीच फुलांनी सजविण्यात आल्या होत्या.
-----
१९ पिंपळनेर
पिंपळनेर येथे संत निळोबाराय महाराजांच्या पादुकांचे पूजन करून पालखी सोहळ्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आले.