श्री क्षेत्र देवगड दिंडीचे ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 13:06 IST2018-07-06T12:01:43+5:302018-07-06T13:06:14+5:30
महाराष्ट्रात शिस्तप्रिय म्हणून प्रसिध्द असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान केले. आज देवगड परिसरात दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

श्री क्षेत्र देवगड दिंडीचे ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान
नेवासा : महाराष्ट्रात शिस्तप्रिय म्हणून प्रसिध्द असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान केले. आज देवगड परिसरात दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
ज्ञानोबा माऊली.., तुकारामाचा जयघोष करीत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली दिंडी आज सकाळी ९ वाजता पंढरपूरकडे निघाली. या दिंडीमध्ये सुमारे १ हजार ४०० महिला - पुरुष भाविकांचा समावेश आहे. प्रस्थानापूर्वी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीसह पालखीमध्ये ठेवण्यात अलेल्या चांदीच्या प्राकृत पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे, तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसिलदार ज्योतीप्रकाश जायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी दिंडीच्या स्वागतासाठी देवगड येथील श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्याचे अग्रभागी अश्व, झांज पथक, बँण्डपथक, पांढराशुभ्र पोशाख घालून शिस्तीत ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करीत चाललेले झेंडेकरी, भजनी मंडळाचे पथक त्यामागे दिंडीत सहभागी वारकरी भाविक, डोक्यावर तुलसी कलश घेत नामस्मरण करणा-या महिला भाविक असे या दिंडीचे स्वरूप होते. यावेळी नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने दिंडी सोबत बंदोबस्त ठेवण्यात आला होता.