डेंग्यूचा संशयित रूग्ण

By Admin | Updated: September 19, 2014 23:41 IST2014-09-19T23:25:26+5:302014-09-19T23:41:01+5:30

श्रीरामपूर : हरेगाव-उंदीरगाव येथे संशयित डेंग्यूचे रूग्ण आढळल्यानंतर डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना हाती घेतल्या.

Dengue suspected patients | डेंग्यूचा संशयित रूग्ण

डेंग्यूचा संशयित रूग्ण

श्रीरामपूर : हरेगाव-उंदीरगाव येथे संशयित डेंग्यूचे रूग्ण आढळल्यानंतर श्रीरामपूर पंचायत समितीने डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना हाती घेतल्या.
पंचायत समिती सभागृहात याबाबतची कार्यशाळा झाली. त्यात तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुभाष गल्हे यांनी श्रीरामपूर तालुक्यात तुरळक स्वरूपात डेंग्यूचे संशयित रूग्ण आढळून येत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघर जाऊन डेंग्यूबाबत जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. घरातील साठविलेल्या पाण्यात तसेच निरूपयोगी भांड्यात साठलेल्या पाण्यात अळ्या आढळून आल्यास त्यांचा नायनाट केल्यास डासोत्पत्ती होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याविषयी नागरिकांना सूचना द्याव्यात. पण यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सर्व ग्रामपंचायतींनी डास प्रतिबंधक धूर फवारणी करण्याचे आदेश गटविकास अधिकारी परीक्षित यादव यांनी सर्व ग्रामसेवकांना दिले आहेत. काही गावात फवारणी सुरू आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप शेजवळ, मदन, सर्वज्ञ यांच्यासह आरोग्यसेवक, आरोग्यसेविका उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Dengue suspected patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.