डेंग्यूने वाढविला ड्रॅगन फ्रूटचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:44 IST2021-09-02T04:44:55+5:302021-09-02T04:44:55+5:30
अहमदनगर : शहरात डेंग्यूचे प्रमाण वाढले असताना ड्रॅगन फ्रूटला मागणी वाढू लागली आहे. इतर फळांच्या तुलनेत ड्रॅगन फ्रूटच्या ...

डेंग्यूने वाढविला ड्रॅगन फ्रूटचा भाव
अहमदनगर : शहरात डेंग्यूचे प्रमाण वाढले असताना ड्रॅगन फ्रूटला मागणी वाढू लागली आहे. इतर फळांच्या तुलनेत ड्रॅगन फ्रूटच्या मागणीत वाढ झाली असून, प्रति किलो १२० रुपयांपर्यंत मिळणाऱ्या ड्रॅगन फ्रूटसाठी आता १६० रुपये मोजावे लागत आहेत.
गेल्या महिन्याच्या तुलनेत ड्रॅगन फ्रूटच्या किमतीत वाढ झाली आहे. ड्रॅगन फ्रूट हे डेंग्यूवरील उपचारासाठी वापरले जाते. सध्या इतर फळांच्या तुलनेत ड्रॅगन फ्रूटला अधिक किंमत आहे. पांढऱ्या रंगाचे ड्रॅगन फ्रूट साधारणपणे प्रति किलो १०० ते १२० रुपयांना मिळतात. लाल रंगाचे ड्रॅगन फ्रूट प्रति किलो १२० ते १६० रुपयांना विकले जात असून, किंमत वाढली असली तरी डेंग्यूच्या रुग्णांसाठी हे फळ उपयोगी आहे. त्यात पावसामुळे ड्रॅगन फ्रूटची आवक घटली आहे. ड्रॅगन फ्रूटची किंमत वाढण्याचे हेही एक कारण आहे. डेंग्यूचे रुग्ण वाढू लागल्याने ड्रॅगन फ्रूटच्या किमतीत अधिक वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
.......
ड्रॅगन फ्रूटचे प्रकार
पांढऱ्या रंगाचे गर असलेले लाल फळ
लाल रंगाचे गर असलेले लाल फळ
पांढऱ्या रंगाचे गर असलेले पिवळे फळ
...
ड्रॅगन फ्रूटचे आरोग्यदायी फायदे
एकदम भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. बरोबर कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन बी तसेच ९० पाणी असते. बाहेरून जाड साल असली तरी आत पांढरा किंवा लाल गर असतो. हे फळ खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. डेंग्यू झाल्यावर हाडे कमजोर होतात. तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होते; पण या फळांचे सेवन केल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्याचबरोबर हाडे पण मजबूत होतात, असे तज्ज्ञ सांगतात.
....
असे आहे दर प्रति किलो
ड्रॅगन फ्रूट- १२० ते १६०
डाळिंब- १० ते १३०
सफरचंद- ६० ते ९०
संत्रा- २० ते ८०
मोसंबी- ५० ते ६०
पपई- २५ ते ३०
पेरू २० ते ६०
......
डेंग्यूवर ड्रॅगन फ्रूटचा उपचार
सध्या शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने ड्रॅगन फ्रूटसारख्या फळांची मागणी वाढू लागली आहे. डेंग्यू झाल्यामुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. ड्रॅगन फ्रूटचे फळ खाल्ल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढून डेंग्यू बरा होतो, असे काहींचे म्हणणे आहे. मात्र, यावर अजून कोणतेही शास्त्रीय संशोधन झालेले नाही. या फळामध्ये जीवनसत्त्व असतात,ते शरीरासाठी उपायुक्त असतात.
.....
- डेंग्यूचे रुग्ण वाढल्याने ड्रॅगन फ्रूटची मागणी वाढली आहे. परंतु, पावसामुळे आवक कमी झाली असून, ड्रॅगन फ्रूटचे दर वाढत आहेत. अन्य फळांच्या किमतीतही वाढ झाली आहे.
- रज्जाक अनिल बागवान, मार्केट यार्ड
...
सूचना: डमी क्रमांक- १११६