बुरूडगावात डेंग्यूने मुलीचा मृत्यू
By Admin | Updated: June 24, 2016 01:24 IST2016-06-24T00:51:37+5:302016-06-24T01:24:41+5:30
अहमदनगर: नगर शहरालगत असलेल्या बुरूडगाव येथे साक्षी पाचारणे या नववीत शिकणाऱ्या मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाला. नगर शहरातील भोसले आखाडा, माळीवाडा,

बुरूडगावात डेंग्यूने मुलीचा मृत्यू
अकोला: अमरावती विभागातील पाच जिल्हय़ांला शासनाने पीक विम्याच्या नुकसानभरपाईपोटी ६८६ कोटी रू पये मंजूर केले असून, जिल्ह्यात खरीप हंगाम सन २0१५-१६ मधील विविध पिकांसाठी अकोला जिल्हय़ाला १३४ कोटी २८ लाख ५९ हजार रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. नुकसानभरपाईची रक्कम शासनाकडून बँकेमार्फत थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे.
आकोट तालुक्यामध्ये कापूस, ज्वारी, सोयाबीन, उडीद, मूग. तेल्हारा तालुक्यामध्ये सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी व तीळ. बाळापूर तालुक्यामध्ये कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी व तीळ. पातूर तालुक्यामध्ये सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग व तीळ. अकोला तालुक्यामध्ये ज्वारी, कापूस, तूर, सोयाबीन, उडीद, मूग व तीळ. बाश्रीटाकळी तालुक्यामध्ये तूर, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग व तीळ, तर मूर्तिजापूर तालुक्यामध्ये सोयाबीन व मूग या पिकांना शासनाकडून नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. सदर नुकसानभरपाईची रक्कम शासनाकडून बँकेमार्फत थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा होईल.
पीक विम्यापोटी आकोट २४ कोटी २९ लाख २६ हजार ८१0, तेल्हारा १४ कोटी ८६ लाख ३३ हजार ५0७, बाळापूर तालुका १७ कोटी १४ लाख ७७ हजार ४0३, पातूर तालुका १७ कोटी ९0 लाख ६५ हजार ५४0, अकोला तालुका ३४ कोटी ५३ लाख ८0 हजार ९९९, बाश्रीटाकळी तालुका ८ कोटी ८५ लाख ६५ हजार ४३१, तर मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकर्यांसाठी ६ कोटी ६८ लाख ९ हजार ८४२ रुपये विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तालुकानिहाय मंजूर पीक विमा रक्कम एकूण १३४ कोटी २८ लाख ५९ हजार ५३२ रुपये आहे. ही रक्कम लवकरच प्राप्त होणार असून, संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या जिल्हय़ातील शेतकर्यांकडून पीक विमा रकमेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा केली जात होती. दरम्यान, शासनामार्फत पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आल्याने दुष्काळग्रस्त शेतकर्यांना आधार मिळणार आहे.