मान्यताप्राप्त एसटी संघटनेची निदर्शने
By Admin | Updated: October 16, 2016 01:05 IST2016-10-16T00:28:07+5:302016-10-16T01:05:35+5:30
अहमदनगर : एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा, तसेच नवीन वेतन करार करावा, यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार

मान्यताप्राप्त एसटी संघटनेची निदर्शने
अहमदनगर : एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा, तसेच नवीन वेतन करार करावा, यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने सर्जेपुरा येथील विभागीय कार्यालयावर निदर्शने केली.
या वेळी संघटनेचे सचिव डी. जी. अकोलकर, अध्यक्ष शिवाजी कडूस, कार्याध्यक्ष रजनी साळवे, कोषाध्यक्ष उत्तम रणसिंग, सहकोषाध्यक्ष रोहिदास अडसूळ, सर्व आगार सचिव यांच्यासह सुमारे ८०० सभासद उपस्थित होते. संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे नवीन वेतन कराराच्या वाटाघाटी सुरू करण्यात आल्या आहेत. वाटाघाटी समितीने मान्यताप्राप्त संघटनेसमवेत घेतलेल्या बैठकीत कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा, शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व एसटी कामगारांचे वेतन यातील तफावत दूर करावी आदींसह ६ टक्के वाढीव महागाई भत्त्याची ७५ टक्के थकबाकी एकरकमी दिवाळीपूर्वी देण्यात यावी, १५ हजार रुपये दिवाळी भेट द्यावी, बंद केलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू कराव्यात, विनंती बदल्या करताना डावललेल्या सेवाज्येष्ठ कामगारांच्या बदल्या कराव्यात, वास्तववादी धाववेळ देण्यात यावी, अशा अनेक मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या सभासदांनी निदर्शने केली.
(प्रतिनिधी)