शिवसैनिकांचे नगरमध्ये निदर्शने; लाठीचार्जच्या घटनेचा निषेध
By अरुण वाघमोडे | Updated: September 2, 2023 18:20 IST2023-09-02T18:20:45+5:302023-09-02T18:20:55+5:30
जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ शनिवारी नगर शहरात शिवसेनेच्यावतने( ठाकरे गट) निदर्शने करून सरकारचा निषेध करण्यात आला.

शिवसैनिकांचे नगरमध्ये निदर्शने; लाठीचार्जच्या घटनेचा निषेध
अहमदनगर : जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ शनिवारी नगर शहरात शिवसेनेच्यावतने( ठाकरे गट) निदर्शने करून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती गणॆश कवडे,माजी महापौर सुरेखा कदम,माजी विरोधी पक्ष नेते संजय शेंडगे, नगरसेवक दत्ता कावरे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड़,शाम नळकांडे, विजय पठारे, दीपक खेरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना फुलसौंदर म्हणाले जनतेचे प्रश्न लावण्यात राज्य सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. जालना येथे मराठा समाजाचे शांतपणे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. या घटनेची जबाबदारी स्विकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. सभापती कवडे यांनीही या घटनेचा निषेध करत राज्य सरकारवर टीका केली. यावेळी उपस्थितांनी सरकारविरोधात मोठी घोषणाबाजी केली.