भारिपची नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:51 IST2018-03-03T19:51:22+5:302018-03-03T19:51:47+5:30
भीमा कोरेगाव दंगलप्रकरण : एकबोटे-भिडे यांना अटक करण्याची मागणी

भारिपची नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
अहमदनगर : भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी राज्यात दलित तरुण व नागरिकांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावे. दंगलीस जबाबदार असणारे मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना अटक करावी व दंगलीत कार्यकर्त्यांच्या वाहनांचे नुकसान झाल्याची भरपाई देण्याच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी अशोक सोनवणे, ज्येष्ठ नेते सुनील शिंदे, भाऊसाहेब कोहकडे, दिलीपराव साळवे, सचिन बडेकर, योगेश थोरात, सागर ठोकळ, अमोल भिंगारदिवे, गणेश आडसूळ, बाळू कसबे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर संपूर्र्ण राज्यातील दलित तरुण व नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत. दंगलीत जबाबदार असलेले मुख्य सूत्रधार मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी. तसेच भीमा कोरेगाव येथील अभिवादन कार्यक्रमासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड झाली, त्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी. ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाढवून शंभर टक्के करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.