नगर शहरात निदर्शने, जेलभरो
By | Updated: December 9, 2020 04:16 IST2020-12-09T04:16:40+5:302020-12-09T04:16:40+5:30
अहमदनगर : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शवून व देशव्यापी बंदमध्ये सहभागी होत नगर शहरात अनेक राजकीय पक्ष, सामाजिक ...

नगर शहरात निदर्शने, जेलभरो
अहमदनगर : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शवून व देशव्यापी बंदमध्ये सहभागी होत नगर शहरात अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, तसेच शेतकरी संघटनांनी निदर्शने केली.
सरकारने पारित केलेले तीनही अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याची मागणी नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन तहसील कार्यालयात नायब तहसीलदार शिल्पा पाटील यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटके, तालुकाध्यक्ष उद्धवराव दुसुंगे, जिल्हा सरचिटणीस केशवराव बेरड, युवक तालुकाध्यक्ष मनोज भालसिंग, राहुल बहिरट, तालुका उपाध्यक्ष संजय बहिरट, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष पापामिया पटेल, बाळासाहेब रोहोकले, भास्कर मगर आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्रातील भाजप सरकार विरोधात निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात बाळासाहेब मिसाळ, राजेंद्र करंदीकर, शिवाजी भोसले, डॉ. भास्कर रणनवरे, इमरान जहागीरदार, अशोक साळवे, मनोहर वाघ, गणेश चव्हाण, सुभाष गायकवाड, शामराव काते, सुरेश गायकवाड, संजय सावंत, राजू शिंदे, समीर शिंदे, दादासाहेब शिंदे, मुफ्ती अल्ताफ, भाऊसाहेब फुलमाळी, अमोल ठुबे, नवनाथ शिंदे, आयुब शेख, विजय सोनवणे, अविनाश देशमुख, किरण सोनवणे आदी सहभागी झाले होते.
समाजवादी पार्टीच्या वतीने भारत बंदला पाठिंबा देण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे, मोहंमद हुसेन, शफी सय्यद, नदीम शेख, मुबीन शेख, परवेज खान, वसीम खान, ओंकार केंद्रे, फईम शेख, दिशान शेख, जावेद शेख आदी उपस्थित होते.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हा शाखेने शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. शेतकरी विरोधातील जुलमी कायदे रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, कार्याध्यक्ष मुकुंद शिंदे, विलास पेद्राम, बाळासाहेब वैद्य, भाऊराव डमाळे, विजय काकडे आदी उपस्थित होते. याशिवाय शिक्षक भारती संघटनेच्या वतीनेही या आंदोलनास पाठिंबा देण्यात आल्याची माहिती राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर यांनी दिली.
------
फोटो - ०८सरकारी कर्मचारी संघटना
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले.
-------------फोटो - ०८किसान सभा जेलभरो
शेतकरीविरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी भारत बंदला प्रतिसाद देत राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले.
-----------
फोटो - ०८नगर तालुका राष्ट्रवादी
नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संपात सहभागी होत नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.