स्मायलिंग अस्मिताकडून देवरेंच्या राजीनाम्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:25 IST2021-08-22T04:25:16+5:302021-08-22T04:25:16+5:30

-------------- फोटो - २१स्माईलिंग अस्मिता पारनेर येथील महिला तहसीलदारांनी जातीचा उल्लेख केल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी स्मायलिंग अस्मिता ...

Demanding Deore's resignation from Smiling Asmita | स्मायलिंग अस्मिताकडून देवरेंच्या राजीनाम्याची मागणी

स्मायलिंग अस्मिताकडून देवरेंच्या राजीनाम्याची मागणी

--------------

फोटो - २१स्माईलिंग अस्मिता

पारनेर येथील महिला तहसीलदारांनी जातीचा उल्लेख केल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

-----------------

‘देवरे यांच्याविरोधात आंदोलन करणार’

पारनेर तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या जमिनी प्रकरणात तहसीलदार ज्योती देवरे यांनी महसूल न्याय विक्री केल्याचा आरोप करून पीपल्स हेल्पलाइन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने पारनेर महसूलच्या न्याय विक्रीचा सत्यबोधी सूर्यनामा आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. सर्व आदिवासी बांधव व संघटनांना बरोबर घेऊन तहसीलदार देवरे यांच्या विरोधात आक्रोश आंदोलन करून सत्यबोधी सूर्यनामा केला जाणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक ॲड. कारभारी गवळी यांनी दिली. टाळेबंदीत पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक करण्यात आली. यामध्ये या भागातील अनेक रस्ते वाळूच्या डंपरमुळे खराब झाले आहेत. गैरकारभारातून त्यांनी कोट्यवधीची माया जमवली असल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. देशात भ्रष्टाचार मुक्तीचा रणसंग्राम पेटविणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तालुक्यात तहसीलदार देवरे यांनी भ्रष्टाचाराला खतपाणी घातले आहे. अशा भ्रष्टाचार प्रवृत्तीला लगाम लावण्यासाठी व आदिवासी बांधवांच्या जमिनी वाचवण्यासाठी सत्यबोधी सूर्यनामा आंदोलन केले जाणार असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हटले आहे.

Web Title: Demanding Deore's resignation from Smiling Asmita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.