स्टेशनरोडवरील नवीन पुलावरील पथदिवे सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:21 IST2021-05-26T04:21:10+5:302021-05-26T04:21:10+5:30
या निवेदनात म्हटले आहे की, दररोज रात्री अंधाराचे साम्राज्य असते. या पुलाला लागूनच स्मशानभूमी आहे. सोमवारी रात्री ...

स्टेशनरोडवरील नवीन पुलावरील पथदिवे सुरू करण्याची मागणी
या निवेदनात म्हटले आहे की, दररोज रात्री अंधाराचे साम्राज्य असते. या पुलाला लागूनच स्मशानभूमी आहे. सोमवारी रात्री कोविडच्या काळात तिथे दररोज मृतदेह अंत्यसंस्काराला आणले जातात. रात्री अशाच एका रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला अंधारामुळे अंदाज न आल्यामुळे स्मशानभूमीकडे जो शार्प यू-क्लिप टर्न आहे तिथे ती रुग्णवाहिका मृतदेहासह उलटण्याच्या बेतात होती. त्यामुळे तातडीने परिसरातील पथदिवे सुरू करावेत, अन्यथा टेंभा आंदोलन करण्याचा इशारा मुळे यांनी निवेदनात दिला आहे. पथदिवे न लावल्यास येत्या दोन-तीन दिवसांमध्ये या पुलावर प्रत्येक लाइट खांबावर दररोज उजेडासाठी टेंभा पेटवून लावला जाईल. अशा प्रकारचे टेंभा आंदोलन आम्ही करू याची नोंद घ्यावी, असा इशारा मुळे यांनी दिला आहे.
फोटो : पथदिवे ( मेलवर )