कोरोना उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:19 IST2021-04-14T04:19:20+5:302021-04-14T04:19:20+5:30
श्रीरामपुरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता १ हजारावर जाऊन पोहोचली आहे. रुग्णांवर सरकारी ग्रामीण रुग्णालय तसेच शहरातील पाच खासगी रुग्णालयामध्ये ...

कोरोना उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी
श्रीरामपुरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता १ हजारावर जाऊन पोहोचली आहे. रुग्णांवर सरकारी ग्रामीण रुग्णालय तसेच शहरातील पाच खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र या सर्व ठिकाणी सध्या बेड्स उपलब्ध नाहीत अशी स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
साखर कामगार रुग्णालय हे गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी ओळखले जाते. त्यांच्याकडे नर्सिंग महाविद्यालय आहे. सर्व आवश्यक सोयी-सुविधा व मेडिकल रुग्णालयाकडे आहे. त्यामुळे येथे कोरोनाच्या रुग्णांवर चांगले उपचार होऊ शकतात. तालुक्याचे सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक व राजकीय नेत्यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणी उभी करावी. हे पैसे साखर कामगार रुग्णालयाला द्यावे. त्यातून निश्चितच शहरवासीयांना दिलासा मिळेल असा विश्वास बिहाणी व छल्लारे यांनी व्यक्त केला आहे. रुग्णांच्या जेवणाकरिता स्वतः ५० हजार रुपये रोख स्वरूपात देण्याची तयारी छल्लारे यांनी दाखविली आहे.
जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये प्रस्थापित नेतेमंडळी आहेत. त्यांच्याकडे मोठमोठ्या संस्था आहेत. मात्र श्रीरामपुरात तशी स्थिती नाही. त्यामुळे कोरोनावर उपचाराकरिता नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन बिहाणी यांनी केले आहे.
यापूर्वी ज्येष्ठ नगरसेवक अंजुम शेख यांनीही साखर कामगार रुग्णालयात उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. मोरया फाउंडेशनचे केतन खोरे हेदेखील सातत्याने आवाज उठवत आहेत.