सारोळा कासार ते खडकी रस्ता दुरूस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 16:07 IST2019-02-06T16:05:47+5:302019-02-06T16:07:37+5:30
नगर तालुक्यातील सारोळा कासार ते खडकी या राज्यमार्गा अत्यंत दुरावस्था झालेली आहे. जागोजागी खड्डे पडलेले असून निकृष्ठ कामामुळे २ किमी रस्त्यावरील डांबरच निघून गेले आहे.

सारोळा कासार ते खडकी रस्ता दुरूस्तीची मागणी
केडगाव : नगर तालुक्यातील सारोळा कासार ते खडकी या राज्यमार्गा अत्यंत दुरावस्था झालेली आहे. जागोजागी खड्डे पडलेले असून निकृष्ठ कामामुळे २ किमी रस्त्यावरील डांबरच निघून गेले आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघात होत आहेत. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरूस्त करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा सारोळा कासार ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
सारोळा कासार (ता. नगर) ग्रामस्थांनी याबाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांची भेट घेवून त्यांना हे निवेदन दिले. सारोळा कासार ते खडकी हा रस्ता सारोळा कासार, घोसपुरी, पारनेर तालूक्यातील अस्तगाव, रायतळे, वाळवणे या गावांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. तसेच सुपा (ता. पारनेर) कडे जाण्याचा हा सोपा मार्ग असत्याने वाळकी, देऊळगाव सिद्धी, हिवरे झरे तसेच श्रीगोंदा तालूकयातील जवळची गावे या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक मोठी आहे. या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. निकृष्ठ कामामुळे तर सारोळा कासार ते जुना सारोळा या २ किमी अंतरावरील डांबराचे अच्छादनच निघून गेले आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होवून अनेकांना कायमचे अपंगत्वही आलेले आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आाला आहे. या निवेदनावर शिवाजी धामणे, संदिप धामणे, संभाजी कडूस, संदिप जाधव, राजाराम धामणे, गणेश धामणे, अशोक शिंगाडे, सुहास कदम, बाबु प्रजापती, विलास धामणे, रामदास वाव्हळ, सागर धामणे, नामदेव पाटील, भाऊसाहेब पाटील, राहूल कडूस, सुनिल कडूस, बाळासाहेब सासवडे, बाबासाहेब धामणे, पोपट काळे, नितीन साळवे, राहूल धामणे, मोहन काळे, एकनाथ धामणे, सोमनाथ झरेकर, अनिल कडूस, नामदेव काळे, सुनिल धामणे यांच्या सह्या आहेत.