पुरातत्त्व खात्याच्या अटी शिथिल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:09 IST2021-08-02T04:09:07+5:302021-08-02T04:09:07+5:30

खा. राऊत शनिवारी सोनईत आले असता कदम यांनी त्यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे की, पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अंतर्गत ...

Demand for relaxation of archeology department conditions | पुरातत्त्व खात्याच्या अटी शिथिल करण्याची मागणी

पुरातत्त्व खात्याच्या अटी शिथिल करण्याची मागणी

खा. राऊत शनिवारी सोनईत आले असता कदम यांनी त्यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे की, पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अंतर्गत नगर शहर व परिसरातील दमडी मशीद, फरहाबक्ष महाल, बारा इमाम, चांदबीबी महाल, मक्का मशीद, दो बोटी चिरा, बागरोजा, जुन्या महानगर पालिकेच्या जवळ असणारी दगडी कमान (नियामतखाना पॅलेस) ही संरक्षित स्मारके आहेत. या वास्तूंच्या शंभर ते तीनशे मीटरच्या हवाई अंतराच्या परिसरात नवीन बांधकाम करण्यास मनाई आहे. मात्र, शंभर मीटर परिसरात असणाऱ्या जुन्या बांधकामांची दुरुस्ती, नूतनीकरण करण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. याशिवाय वास्तूच्या शंभर ते तीनशे मीटरच्या परिसरात नवीन बांधकाम करण्यासाठी देखील पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागते. यामधील बहुतांशी वास्तू या मध्यवर्ती शहरातच आहेत. त्यामुळे मध्य शहराच्या विकासात अडथळे आले आहेत. हे अडथळे दूर करण्याची मागणी यात करण्यात आली आहे.

Web Title: Demand for relaxation of archeology department conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.