कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:21 IST2021-04-22T04:21:36+5:302021-04-22T04:21:36+5:30
या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
मागील महिन्यापासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बारावीच्या परीक्षा याअगोदरच पुढे ढकलण्याबाबत निर्णय झाला आहे. मात्र, २३ मे रोजी होणाऱ्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत अद्यापही निर्णय झालेला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या शिष्यवृत्ती परीक्षा यानंतर घेतल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. या परीक्षा जून किंवा जुलैमध्ये घेऊन, त्याच वर्षापासून शिष्यवृत्ती देता येऊ शकेल. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, प्रा. सुनील पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, सखाराम गारुडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनील सुसरे, सुभाष ढेपे आदींनी केली आहे.