तालुकास्तरावर ऑक्सिजन बेडच्या कोविड सेंटरची पवार यांच्याकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST2021-06-03T04:16:23+5:302021-06-03T04:16:23+5:30
अहमदनगर : जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी नगर शहरात येत असून, शहरातील आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना ...

तालुकास्तरावर ऑक्सिजन बेडच्या कोविड सेंटरची पवार यांच्याकडे मागणी
अहमदनगर : जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी नगर शहरात येत असून, शहरातील आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी करण्यासाठी तालुकास्तरावर ऑक्सिजनचे बेड असलेले कोविड सेंटर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारला सूचना करावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडे केली.
आमदार संग्राम जगताप यांनी शरद पवार यांची बुधवारी त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नगर शहरातील कोरोनाच्या परिस्थितीची आमदार जगताप यांनी माहिती दिली. अहमदनगर जिल्ह्यात मागील काळात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले. उपचारासाठी जिल्ह्यातून रुग्ण नगर शहरात येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. येत्या ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करताना तालुका स्तरावर ऑक्सिजनचे बेड असलेले कोविड सेंटर सुरू करण्याबाबत केंद्र शासनाला सूचना करावी, अशी मागणी जगताप यांनी केली.
.....
सावेडी भुयारी गटार योजनेबाबत खासदार सुळे यांच्याशी चर्चा
महापालिकेने प्रस्तावित केलेली सावेडी भुयारी गटार योजना मंजूर करण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशीही जगताप यांनी चर्चा केली. सदर योजनेची जगताप यांनी सविस्तर माहिती देऊन योजना मंजुरीसाठी पाठपुरवा करण्याची मागणी केली.
...
शासकीय महाविद्यालयाची केली मागणी
आमदार जगताप यांनी उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन नगर शहरात शासकीय अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय मंजूर करण्याची मागणी केली असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
..
सूचना फोटो आहे.