जागेवरील आरक्षण उठविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST2021-01-14T04:17:23+5:302021-01-14T04:17:23+5:30

कोपरगाव : शहरातील सर्व्हे नंबर २१५ मध्ये काही नागरिक पक्की घरे बांधून राहत आहेत; परंतु कोपरगाव नगर परिषदेने १९८० ...

Demand to lift reservation on space | जागेवरील आरक्षण उठविण्याची मागणी

जागेवरील आरक्षण उठविण्याची मागणी

कोपरगाव : शहरातील सर्व्हे नंबर २१५ मध्ये काही नागरिक पक्की घरे बांधून राहत आहेत; परंतु कोपरगाव नगर परिषदेने १९८० पासून आरक्षण टाकलेले आहे. या घरांची कोपरगाव नगर परिषद कार्यालयामध्ये घरपट्टी, पाणीपट्टी तसेच महावितरणकडून वीज कनेक्शन घेऊन नागरिक बिल भरत आहेत. या सर्व बाबी असतानाही राहत्या घरावर, जमिनीवर आरक्षण आहे. हे आरक्षण उठविण्यासंदर्भात कोपरगाव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विषय घेऊन आरक्षण उठविण्यासाठी कारवाई होऊन ठराव करण्यात यावा, या मागणीचे येथील स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना बुधवारी (दि.१३) निवेदन दिले आहे. निवेदनावर मुजीब शेख, जावेद शेख, समीर शेख, साजू बागवान, युसूफ शेख, समीर कुरेशी, तोफीक कुरेशी, मेहमूद अत्तार, नासिर कुरेशी यांच्या स्थानिक नागरिकांच्या सह्या आहेत.

Web Title: Demand to lift reservation on space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.