निंबळक बायपास चौकात गतिरोधक बसविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:22 IST2021-02-11T04:22:05+5:302021-02-11T04:22:05+5:30

या मागणीचे निवेदन बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअधीक्षक अभियंता चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नगर तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, ...

Demand for installation of speed bumps at Nimbalak Bypass Chowk | निंबळक बायपास चौकात गतिरोधक बसविण्याची मागणी

निंबळक बायपास चौकात गतिरोधक बसविण्याची मागणी

या मागणीचे निवेदन बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअधीक्षक अभियंता चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नगर तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, माजी सरपंच विलास लामखडे, सीताराम सकट, समीर पटेल, बाळासाहेब ढवळे, भाऊराव गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, अशोक पवार, भाऊराव शिंदे, बाबासाहेब पगारे, श्रीकांत शिंदे, राजाराम घोलप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. निंबळक (ता. नगर) बायपास चौक येथे चार रस्ते एकत्र येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. तर सदरील रस्त्यावर अवजड वाहने भरधाव जात असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. काही अपघातांमध्ये अनेक ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला आहे. या चौकात वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक व सिग्नल बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Demand for installation of speed bumps at Nimbalak Bypass Chowk