नगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 16:39 IST2018-10-20T16:39:06+5:302018-10-20T16:39:10+5:30
नगर जिल्ह्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणी, चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्य सरकारने नगर जिल्हा दुष्काळी जाहीर करावा

नगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन
केडगाव : नगर जिल्ह्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणी, चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्य सरकारने नगर जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, दुष्काळ निवारण्याच्या योजना तातडीने सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.
मंत्री पाटील यांना सेनेच्या शिष्टमंडळाने नुकतेच निवेदन दिले. नगर जिल्ह्यात सरासरीपेक्षाही खूपच कमी पाऊस आहे. त्यामुळे पिके जळून गेली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर त्वरीत सुरू करणे गरजेचे आहे. जनावरांच्या चाºयाचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरच जनावरांच्या छावण्याही सुरू करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास शेतकºयांचे पशुधन शिल्लक राहणार नाही. टँकर व छावण्या सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, त्यामुळे दुष्काळावर मात करणे सोयीस्कर होईल, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी सेनेचेचजिल्हा समन्वयक घनयाम शेलार, पंचायत समिती सभापती रामदास भोर, नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, उप जिल्हा प्रमुख अनिल कराळे, स्वप्निल लांडगे आदी उपस्थित होते.