‘परळी अर्बन’च्या संचालकांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:27 IST2021-09-09T04:27:24+5:302021-09-09T04:27:24+5:30
याबाबत आर्थिक गुन्हे शाखेत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी मानव अधिकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. पंकज लोखंडे, संदीप ठोंबे, ...

‘परळी अर्बन’च्या संचालकांवर कारवाईची मागणी
याबाबत आर्थिक गुन्हे शाखेत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी मानव अधिकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. पंकज लोखंडे, संदीप ठोंबे, अनिल गायकवाड, संदीप कापडे, संतोष वाघ, शरद महापुरे, रमेश आल्हाट, वैशाली पेगदड, विजय दुबे, ठेवीदार अशोक गायकवाड, प्रा. कडू काळे, प्रफुल्लचंद्र ठाकूर, नितिन साठे, जावेद सय्यद, जाकीर शेख आदी उपस्थित होते. परळी अर्बनचे मुख्य कार्यालय पुणे जिल्ह्यात हडपसर येथे आहे. या सोसायटीने नगर जिल्ह्यामधील श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यात शाखा सुरू केल्या होत्या. या शाखांच्या माध्यमातून फक्त ठेवी गोळा करण्याचे काम करण्यात आले, तसेच कोणत्याही प्रकारचे कर्ज वाटप करण्यात आलेले नाही. ठेवीदारांनी बँकेकडे ठेवीची मागणी केली असता, त्यांनी खोटे चेक देण्यात आले होते. ठेवीदारांनी तक्रार केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यातील आरोपींवर कठोर कारवाई करून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.