अद्ययावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST2021-05-27T04:22:27+5:302021-05-27T04:22:27+5:30
राहुरी : जिल्हा परिषद, अहमदनगरच्या माध्यमातून उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेल्या अद्ययावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच ज्येष्ठ नेते ॲड. ...

अद्ययावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण
राहुरी : जिल्हा परिषद, अहमदनगरच्या माध्यमातून उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेल्या अद्ययावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच ज्येष्ठ नेते ॲड. सुभाष पाटील व जिल्हा परिषद सदस्य शशिकला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील उंबरे, देवळाली प्रवरा, मांजरी, टाकळीमिया व गुहा या पाच ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रांना अद्ययावत रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत.
उंबरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णांच्या सेवेसाठी व सोयीसाठी रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषद सदस्य शशिकला पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. या रुग्णवाहिकेच्या लोकार्पणावेळी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. दीपाली गायकवाड, उंबरेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश जाधव उपस्थित होते.