स्नेहालयात सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST2020-12-11T04:46:42+5:302020-12-11T04:46:42+5:30

अहमदनगर : स्नेहालय पुनर्वसन प्रकल्पात गुरुवारी ३० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे आणि मोबाईल मेडिकल वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ...

Dedication of solar energy project at Snehalaya | स्नेहालयात सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण

स्नेहालयात सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण

अहमदनगर : स्नेहालय पुनर्वसन प्रकल्पात गुरुवारी ३० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे आणि मोबाईल मेडिकल वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी एसबीआय म्युचअल फंडचे एस. गणेशन उपस्थित होते. स्नेहालयाच्या सर्व उपक्रमांना गणेशन यांनी भेट दिली.

सौरऊर्जा प्रकल्प आणि मोबाईल मेडिकल व्हॅन या सुविधांमुळे व्हॉनमध्ये रुग्णाची तपासणी, रक्त, लघवी इत्यादी प्राथमिक तपासण्या, एक्सरे बघण्याची सुविधा, औषधे देण्यासाठी फार्मसी, सर्व प्रकारची वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यासाठी सुविधा आहेत. तसेच झोपडपट्ट्या खेडेगाव, वाड्या-वस्त्या, औद्योगिक वसाहतीमधील लघुउद्योग तसेच नगर, राहुरी आणि पारनेर तालुक्यातील भटके विमुक्त, दलित वस्त्या येथे वैद्यकीय शिबिरे, कामगारांची आरोग्य तपासणी इत्यादी सुविधा देणे शक्य होणार आहे. यावेळी संजय गुगळे, हनीफ शेख, प्रवीण मुत्याल, मिलिंद कुलकर्णी, संजय बंदिष्टी जयकुमार मुनोत, डॉ. आतिश केदारी, डॉ. पंकज गडाख, डॉ. मारसिया वॉरन, डॉ. स्वाती आणि सुहास घुले, विष्णू कांबळे, डॉ. सोनल रणसिंग, डॉ. सायली नाश्ते, डॉ. पूजा वाघ, डॉ. पर्वणी लाड, डॉ. अभिजित वांढेकर, अनिल गावडे, भारत सेवक निक कॉक्स, जोयस कोनोली आदी उपस्थित होते.

Web Title: Dedication of solar energy project at Snehalaya