साईनाथ रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:37 IST2021-03-13T04:37:35+5:302021-03-13T04:37:35+5:30

साई संस्थानने साईनाथ रुग्णालय इमारतीच्या बांधलेल्या तिसऱ्या मजल्यावर हा अतिदक्षता कक्ष उभारण्यात आला आहे. मुंबई येथील हरेश उत्तमचंदानी यांनी ...

Dedication of Intensive Care Unit at Sainath Hospital | साईनाथ रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

साईनाथ रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

साई संस्थानने साईनाथ रुग्णालय इमारतीच्या बांधलेल्या तिसऱ्या मजल्यावर हा अतिदक्षता कक्ष उभारण्यात आला आहे. मुंबई येथील हरेश उत्तमचंदानी यांनी या कक्षासाठी हसनानंद सजनानी व नथमल सजनानी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दीड कोटींची देणगी दिली आहे.

उत्तमचंदानी यांच्या परिवारातील सदस्य डॉ. जयकिशन मोरदानी, फर्निचर सेटअप देणारे भूषण शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या हस्ते कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी संस्थानचे डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, दिलीप उगले, साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. मैथिली पितांबरे, डॉ. महेंद्र तांबे, स्टोअरकीपर सुनील निकम, तुषार शेळके उपस्थित होते.

या अतिदक्षता कक्षासाठी दीड कोटींच्या देणगीमध्ये रिमोट ऑपरेटेड बेड, व्हेंटीलेटर, बायपॅप मशीन, ईसीजी मशीन, मल्टीपॅरा मॉनिटर्स, सीएनएस सिस्टीम, मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा, सिरींज पंप, फर्निचर, आयसोलेशन रूम, इत्यादी वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. नवीन मेल मेडिकल वाॅर्डसाठी पुणे येथील क्वॉलिजर सर्जिकलचे भूषण शहा यांनी स्वर्गवासी अंजली शहा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पावणेसहा लाख रुपये किमतीचे संपूर्ण वाॅर्ड फर्निचर सेटअप देणगी स्वरूपात दिले.

Web Title: Dedication of Intensive Care Unit at Sainath Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.