एरंडोली येथे विकासकामांचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:18+5:302021-06-26T04:16:18+5:30
ढवळगाव/विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली येथे चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत करण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्प, स्वागत कमानीचे लोकार्पण नुकतेच जिल्हा ...

एरंडोली येथे विकासकामांचे लोकार्पण
ढवळगाव/विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली येथे चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत करण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्प, स्वागत कमानीचे लोकार्पण नुकतेच जिल्हा बँकेचे संचालक राहुल जगताप, पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्या कोमल वाखारे, पंचायत समितीच्या सभापती गीतांजली पाडळे, पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच संजय इथापे, उपसरपंच अंकिता मोरे, माजी सरपंच माधव इथापे, छगन इथापे, दत्तात्रय इथापे, कर्मयोगी कुंडलिकराव जगताप, कुकडी साखर कारखान्याचे संचालक प्रल्हाद इथापे, माजी संचालक दिलीप इथापे, कचरुमामा मोरे, सेवा सोसायटीचे अध्यक्ष शहाजी इथापे, भाऊसाहेब इथापे, बाळासाहेब इथापे, पोलीस पाटील रवींद्र इथापे, खंडू इथापे, विनायक इथापे, सागर जठार, ग्रामसेवक आडसूळ, तंटामुक्ती अध्यक्ष आबा पठारे आदी उपस्थित होते.