पिंपळगाव माळवी येथे काऊ लिफ्टिंग मशीनचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:36 IST2020-12-12T04:36:58+5:302020-12-12T04:36:58+5:30
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जिल्हा परिषदेने दिलेल्या काऊ लिफ्टिंग मशीनचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे ...

पिंपळगाव माळवी येथे काऊ लिफ्टिंग मशीनचे लोकार्पण
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जिल्हा परिषदेने दिलेल्या काऊ लिफ्टिंग मशीनचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
काऊ लिफ्टिंग मशीनमुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मोलाची मदत होणार आहे. आजारी जनावरांचे उपचार करण्यासाठी या मशीनचा शेतकऱ्यांनी उपयोग करून घ्यावा, असे यावेळी शेळके म्हणाले. यावेळी पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, पंचायत समिती सदस्य व्ही. डी. काळे, जेऊरचे पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल कराळे, पशुधन पर्यवेक्षक डॉ. अर्चना दळवी, डॉ. संजय चोभे, डॉ. अशोक जाधव, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय शेळके, प्रा. आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा तांबे, शाखा अभियंता एम. आर. कसबे, अनिल राऊत, उपअभियंता जोशी, वनिता राऊत, नानासाहेब झिने, मेजर विश्वनाथ गुंड, बापू बेरड, गोरख आढाव, सावळेराम झिने, नामदेव गुंड आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. अनिल कराळे यांनी केले.