मढी येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:19 IST2021-04-17T04:19:52+5:302021-04-17T04:19:52+5:30
तिसगाव : मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड व स्व. राजीवजी राजळे मित्रमंडळाच्या वतीने रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे. ...

मढी येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण
तिसगाव : मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड व स्व. राजीवजी राजळे मित्रमंडळाच्या वतीने रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे. त्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा गुढीपाडव्याच्या दिवशी मढी येथे आ. मोनिका राजळे यांच्या हस्ते झाला.
ही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी परिसरातील गावांना चोवीस तास उपलब्ध राहील, अशी ग्वाही देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी दिली. देवस्थानचे कोषाध्यक्ष राधाकिसन मरकड, सचिव विमल मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रभान पाखरे, पोपट घोरपडे, जनार्धन मरकड, गणेश मरकड, रोहिणी मरकड, विधिज्ञ मोनाली पोळ, कामगार तलाठी पल्लवी भराट, शिवतेज विद्यालयाचे समन्वयक बाळासाहेब मरकड, भानुविलास मरकड, भाग्येश मरकड, अशोक महाराज मरकड, नवनाथ मरकड आदी उपस्थित होते. ही रुग्णवाहिका परिसरातील गावे व वाड्या-वस्त्यावरील लोकांसाठी जीवनदायी ठरणार असल्याची भावना मोनिका राजळे यांनी व्यक्त केली. व्यवस्थापक बाबासाहेब मरकड यांनी आभार मानले.
--
१६ मढी
मढी येथे रुग्णवाहिकेचे आ. मोनिका राजळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.