देडगावकर यांनी वाचवले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:20 IST2021-03-14T04:20:45+5:302021-03-14T04:20:45+5:30
---------------- मंत्री थोरात यांचा दौरा अहमदनगर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे रविवारी (दि. १४) सकाळी ९ वाजता थोर स्वातंत्र्यसेनानी ...

देडगावकर यांनी वाचवले प्राण
----------------
मंत्री थोरात यांचा दौरा
अहमदनगर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे रविवारी (दि. १४) सकाळी ९ वाजता थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या अकराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अमृतेश्वर मंदिरासमोरील प्रांगणात अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर यांच्या उपस्थितीत अभिवादन करणार आहेत. सकाळी ११ वाजता घुलेवाडी येथील नवीन कोर्टाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे माहिती कार्यालयाच्या पत्रकात म्हटले आहे.
-------------------
बोरुडे मळा अंधारात
अहमदनगर : बालिकाश्रम रोडवरील पंचशीलनगर, बोरुडे मळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून वीज वाहिनीची दुरुस्ती सुरू असल्याने या भागातील वीजपुरवठा तीन दिवसांपासून खंडित झाला आहे. गुरुवारी रात्रीपासून ते शुक्रवारी दुुपारपर्यंत वीज बंद होती. पंचशीलनगरमधील रोहित्रात बिघाड झाल्याने वीज खंडित होती. शनिवारी सकाळपासून दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित होता. तो रात्री उशिरापर्यंत पूर्ववत झाला नव्हता, तसेच गुरुवारी रात्री अचानक वीजपुरवठा जास्त दाबाने झाल्याने अनेकांची इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक उपकरणे जळाली, तर दोन दिवसांपासून वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, वीज खंडित झाल्याने नागरिकांनी केलेल्या तक्रारींबाबत वीज मंडळाच्या सावेडी कार्यालयातून प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
---------