चुकीच्या आहार पद्धतीमुळे आयुष्यमानात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST2021-09-14T04:25:26+5:302021-09-14T04:25:26+5:30
जवळे : चुकीच्या आहार पद्धतीमुळे मानवाच्या शरीरावर दुष्परिणाम होत आहेत. त्यातूनच दिवसेंदिवस मानवाचे आयुष्यमान घटत आहे, असे प्रतिपादन पंचायत ...

चुकीच्या आहार पद्धतीमुळे आयुष्यमानात घट
जवळे : चुकीच्या आहार पद्धतीमुळे मानवाच्या शरीरावर दुष्परिणाम होत आहेत. त्यातूनच दिवसेंदिवस मानवाचे आयुष्यमान घटत आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांनी केले.
जवळे (ता. पारनेर) येथे जवळे अंगणवाडी बीट केंद्रामार्फत सकस आहार सप्ताहास सोमवारी प्रारंभ झाला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी ३० अंगणवाडी सेविकांनी विविध भाजीपाल्याचे प्रकार, कडधान्य, वेगवेगळे पदार्थ तयार करून आणले होते. या पदार्थांचा आस्वाद डॉ. पठारे, सरपंच अनिता आढाव, ग्रामपंचायत सदस्यांनी घेतला.
यावेळी माजी सरपंच रत्नमाला शिंगाडे, बाल विकास अधिकारी नारायण कराळे, टाकळी ढोकेश्वर गटाच्या पर्यवेक्षिका सुजाता लंके, राळेगणसिद्धी गटाच्या पर्यवेक्षिका ज्योती तवले, कान्हूर पठार गटाच्या कमल राऊत, पवळे गटाच्या संगीता बोठे, रोही गटाच्या अनिता बारवकर, वडझिरे गटाच्या तेजस्विनी मैड आदी उपस्थित होते.
-----
अंगणवाडी सेविकांसाठी सभागृह द्या..
जवळे बीट अंतर्गत ३० अंगणवाड्या आहेत. प्रत्येक महिन्याची बैठक, विविध कार्यक्रम घेण्यासाठी गावातील मंदिर अथवा खासगी जागेचा वापर करावा लागतो. त्यामुळे विविध अडचणींना सामोरे जावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी जवळे येथे अंगणवाडी सेविकांसाठी सभागृह उभारावे, अशी मागणी अंगणवाडी सेविका संघटनेच्या पारनेर तालुकाध्यक्षा संगीता विश्वासराव यांनी डॉ. पठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
-----
१३ पोषण आहार
जवळे येथे सकस आहार सप्ताहानिमित्त विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे व इतर.