आठ महिन्यांनंतर खाद्यतेलाच्या दरात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST2021-06-22T04:14:56+5:302021-06-22T04:14:56+5:30

खाद्यतेलाच्या किमतीमध्ये आठ महिन्यांनंतर प्रथमच ही घसरण दिसून आली आहे. मात्र अद्यापही किरकोळ बाजारामध्ये ग्राहकांना पुरेसा दिलासा मिळालेला नाही. ...

Decline in edible oil prices after eight months | आठ महिन्यांनंतर खाद्यतेलाच्या दरात घट

आठ महिन्यांनंतर खाद्यतेलाच्या दरात घट

खाद्यतेलाच्या किमतीमध्ये आठ महिन्यांनंतर प्रथमच ही घसरण दिसून आली आहे. मात्र अद्यापही किरकोळ बाजारामध्ये ग्राहकांना पुरेसा दिलासा मिळालेला नाही. मात्र पुढील काळात या दरात आणखी घट होण्याची चिन्हे आहेत. येणारी दिवाळी ग्राहकांना अधिक गोड होईल अशी अपेक्षा तेल विक्रेते व किराणा व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

प्रामुख्याने सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घट नोंदविली गेली आहे. त्यापाठोपाठ सूर्यफुलाच्या दरानेही दिलासा दिला आहे. शेंगदाणा तेलाचे दर मात्र जैसे थे राहिले आहेत. पाम तेलाच्या किमतीही घटल्या आहेत.

----------

मिश्र तेल खाण्याकडे कल

कोविडमुळे डॉक्टरांच्या सल्ल्याला आता अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळे एकाच प्रकारच्या तेलबियांचे खाद्यतेल खाण्यापेक्षा ते बदलून खाण्याकडे कल वाढला आहे. तर काही ग्राहक हे किराणा दुकानातच सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा, करडईचे मिश्रण करून घेऊन जातात, अशी माहिती दुकानदारांनी दिली. राईस ब्रँडनाही श्रीमंतांची पसंती ठरले आहे.

----------

गृहिणींचे बजेट कोलमडले

मध्यमवर्गीय छोट्या कुटुंबाचे एक महिन्याचे किराणा मालाचे बजेट जर दोन हजार रुपये होत असेल, तर त्यातील ८०० ते ९०० रुपये हे केवळ खाद्यतेलाला मोजावे लागत होते. त्यामुळे गृहिणींचे बजेट पूर्णत: कोलमडून गेले होते. अजूनही त्यांना फारसा दिलासा मिळालेला नाही.

---------

खाद्यतेलाचे दर (पूर्वीचे व आताचे)

सूर्यफूल : १७४ : १६८

सोयाबीन : १५३ : १४२

शेंगदाणा : १८० : १८०

पाम : १४० : १२०

-----------

पूर्वीच्या काळी ज्वारीमध्ये करडईचे आंतरपीक घेतले जात होते. खरिपात तीळाचे उत्पादन होत असते. उशिरा पेरणी झाली तर सूर्यफुलाची लागवड केली जात होती. आता ही पीकपद्धती नष्ट झाली आहे. पॅटर्न बदलल्यामुळे शेतकऱ्यांना तेल विकत घ्यावे लागत आहे.

- सुरेश ताके, शेतकरी

--------

Web Title: Decline in edible oil prices after eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.