श्रीगोंदा : स्व. बन्सीलाल नाहाटा ट्रस्ट व पुणे येथील भुलेश्वरी शुगरने लोणीव्यंकनाथ येथील प्राथमिक शाळेत ऑक्सिजनची सुविधा असलेले ५० बेडचे कोरोना हेल्थ केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती लोणीव्यंकनाथचे उपसरपंच मितेश नाहाटा यांनी दिली.
या कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दहा बेडसाठी सोमवारपासून ऑक्सिजन सिस्टम सुरू होईल. सेंटरमध्ये औषधे ऑक्सिमीटर, तापमान मापक, वजनमापक, बीपी चेक मशीन बसविण्यात येणार आहे. रुग्णांची देखभाल करण्यासाठी डॉक्टर, केरळी परिचारिका नियुक्त करण्यात आल्या आहेत.
हे कोविड सेंटर तातडीने सुरू करण्यासाठी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, सरपंच रामदास ठोंबरे, बाबासाहेब कुंदाडे, लालासाहेब काकडे, राहुल गोरखे, गणेश काकडे विशेष प्रयत्न करीत आहेत.
लोणीव्यंकनाथ परिसरातील गावांमध्ये कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही नाहाटा यांनी सांगितले.
...
लोणीव्यंकनाथचे उपसरपंच मितेश नाहाटा व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लोणीव्यंकनाथ कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मदत होईल.
-डॉ. नितीन खामकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, श्रीगोंदा.