दारूनिर्मिती न करण्याचा निर्णय दूरदृष्टीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST2021-03-15T04:19:40+5:302021-03-15T04:19:40+5:30

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी कारखान्यातून दारूनिर्मिती न करण्याचा निर्णय दूरदृष्टीने घेतला. हीच परंपरा व आदर्श तत्त्वे साखर ...

The decision not to make alcohol is far-sighted | दारूनिर्मिती न करण्याचा निर्णय दूरदृष्टीने

दारूनिर्मिती न करण्याचा निर्णय दूरदृष्टीने

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी कारखान्यातून दारूनिर्मिती न करण्याचा निर्णय दूरदृष्टीने घेतला. हीच परंपरा व आदर्श तत्त्वे साखर कारखाना व अमृत उद्योगसमूहाने जपत देशात लौकिक प्राप्त केला आहे. आर्थिक शिस्त, काटकसर, पारदर्शक या वाटचालीवर मार्गक्रमण करत असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची वाटचाल गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

कारखान्याच्या ४० हजार लिटर क्षमतेच्या नवीन इथेनॉल प्रकल्पासह सीपीयू युनिट व लिप्टचा शुभारंभ रविवारी (दि. १४) करण्यात आला. यावेळी मंत्री थोरात बोलत होते. यावेळी अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, अमृतवाहिनी बँकेचे अध्यक्ष अमित पंडित, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्त्वांवर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करत संगमनेर तालुका प्रगतिपथावर पोहोचला आहे. कारखान्याने नव्याने पाच हजार पाचशे मेट्रिक टन क्षमतेसह ३० मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प हाती घेतला. हा सर्वांसाठी दिशादर्शक ठरला. याचबरोबर डिस्टलरी प्रकल्पाचे नूतनीकरण करताना चाळीस हजार लिटर क्षमतेच्या नवीन इथेनॉल प्रकल्प सुरू झाला. वीजनिर्मिती व इथेनॉल प्रकल्पातून कारखान्याला मदत होणार आहे. असेही मंत्री थोरात म्हणाले.

कारखान्याचे संचालक चंद्रकांत कडलग, मीनानाथ वर्पे, रोहिदास पवार, रमेश गुंजाळ, माणिक यादव, अनिल काळे, संपतराव गोडगे, गणपतराव सांगळे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, दादासाहेब कुटे, आर.बी. रहाणे, मंदा वाघ, विनोद हासे, अभिजित ढोले, भास्करराव आरोटे, हौशीराम सोनवणे, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, भारत मुंगसे, किशोर टोकसे, राजेंद्र गुंजाळ, मीरा वर्पे, किरण कानवडे, भारत देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी, तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले.

Web Title: The decision not to make alcohol is far-sighted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.