उसनवारीच्या पैशातून मारहाण झालेल्या तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:19 IST2021-05-16T04:19:48+5:302021-05-16T04:19:48+5:30

पाथर्डी : तालुक्यातील लोहसर खांडगाव येथे ३७ वर्षीय तरुणाला उसनवारीने घेतलेले पैसे परत न केल्याने बुधवारी (दि. १२) मारहाण ...

Death of a young man who was beaten with loan money | उसनवारीच्या पैशातून मारहाण झालेल्या तरुणाचा मृत्यू

उसनवारीच्या पैशातून मारहाण झालेल्या तरुणाचा मृत्यू

पाथर्डी : तालुक्यातील लोहसर खांडगाव येथे ३७ वर्षीय तरुणाला उसनवारीने घेतलेले पैसे परत न केल्याने बुधवारी (दि. १२) मारहाण झाली होती. त्या तरुणाचा गुरुवारी (दि. १३) उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पाथर्डी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सुदाम विक्रम गीते (वय ३७, रा. लोहसर खांडगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दोघा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहसर खांडगाव येथील सुदाम गीते याने दारू पिण्यासाठी दत्तात्रय भाऊसाहेब वांढेकर, किरण सखाराम वांढेकर यांच्याकडून उसनवारीने पैसे घेतले होते. त्याच्याकडे हे दोघे पैशांची मागणी करीत होते. मात्र अनेक दिवसांनंतरही सुदाम हा उसनवारीने घेतलेले पैसे देत नाही, असे म्हणत त्या दोघांनी सुदाम गीते यास मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी पोटात, छातीवर, खांद्यावर मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला गावातीलच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गुरुवारी (दि. १३) सुदाम गीते याचा मृत्यू झाला. मयताचा भाऊ आदिनाथ विक्रम गीते (वय ४२, रा. लोहसर खांडगाव) याने शुक्रवारी (दि. १४) पाथर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय भाऊसाहेब वांढेकर व किरण सखाराम वांढेकर (दोघे रा. लोहसर खांडगाव) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Death of a young man who was beaten with loan money