कोपर्डीत उष्माघाताने महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: April 29, 2016 23:25 IST2016-04-29T23:19:44+5:302016-04-29T23:25:51+5:30
कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण नजीकच्या कोपर्डी येथील जनाबाई सोपान सुद्रिक (वय ७०) यांचा शुक्रवारी उष्माघातात मृत्यू झाला.

कोपर्डीत उष्माघाताने महिलेचा मृत्यू
कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण नजीकच्या कोपर्डी येथील जनाबाई सोपान सुद्रिक (वय ७०) यांचा शुक्रवारी उष्माघातात मृत्यू झाला.
जनाबाई बुधवारी दुपारी एकच्या सुमारास शेतात गेल्या होत्या. उन्हाच्या तीव्र झळांनी त्या जागीच चक्कर येऊन पडल्या. त्यांना उपचारासाठी तत्काळ नगरला हलविण्यात आले. नगरच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. उष्माघाताने मेंदूला ताप चढल्याने उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. गुरुवारी सायंकाळी त्यांना घरी आणण्यात आले. अखेर शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. कोपर्डीचे सरपंच सतीश सुद्रिक यांच्या त्या चुलती होत. (वार्ताहर)