नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर राहुरी फॅक्टरी येथे मालट्रकचा ताबा सुटल्याने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 16:12 IST2018-02-05T16:11:10+5:302018-02-05T16:12:04+5:30
नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर राहुरी फॅक्टरी येथे चालकाचा मालट्रकवरील ताबा सुटल्याने अपघात होऊन दुचाकीवरील छाया मुसमाडे (वय ४५, रा. तांभेरे, ता. राहुरी) या महिलेचा मृत्यू झाला.

नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर राहुरी फॅक्टरी येथे मालट्रकचा ताबा सुटल्याने महिलेचा मृत्यू
राहुरी : नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर राहुरी फॅक्टरी येथे चालकाचा मालट्रकवरील ताबा सुटल्याने अपघात होऊन दुचाकीवरील छाया मुसमाडे (वय ४५, रा. तांभेरे, ता. राहुरी) या महिलेचा मृत्यू झाला. तनपुरे कारखाना पेट्रोल पंपसमोमार रविवारी हा अपघात झाला.
कोल्हारकडून राहुरीच्या दिशेने मालट्रक (क्रमांक एम. एच. १७, टी. ९५३७) येत होता. दुचाकीवरून (क्रमांक एम. एच. १७, ए. एल. ४७२) लक्ष्मण मुसमाडे जात होते. त्यांच्यामागे मोटारसायकलवर छाया बसल्या होत्या. दोघेही नातेवाईकांकडे चालले होते. चालकाचा मालट्रकवरील ताबा सुटून दुचाकीस जोराची धडक बसली. यात छाया मुसमाडे यांच्या डोक्याला जबर मार बसून मोठया प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्या जागीच ठार झाल्या.
राहुरी पोलीस ठाण्यात या अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. तीन दिवसांपूर्वी पेट्रोलपंपासमोर झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले होते.