भंडारदऱ्यात बुडून पर्यटकाचा मृत्यू
By Admin | Updated: September 28, 2014 23:27 IST2014-09-28T23:23:15+5:302014-09-28T23:27:44+5:30
राजूर : रविवारची सुट्टी असल्याने पर्यटनासाठी मुंबईहून आलेल्या तरूणांपैकी एकजण भंडारदरा धरणात पाय घसरून पडला.

भंडारदऱ्यात बुडून पर्यटकाचा मृत्यू
राजूर : रविवारची सुट्टी असल्याने पर्यटनासाठी मुंबईहून आलेल्या तरूणांपैकी एकजण भंडारदरा
धरणात पाय घसरून पडला.
मित्रांनी त्याला नाशिकला दवाखान्यात हलविले, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. संबंधित तरूण हा मुळचा तो दक्षिण भारतातील आहे.
व्यंकट वेमुल्ला पल्ली (वय २४) असे मृत तरूणाचे नाव आहे. मुंबईत काम करणारा पल्ली हा रविवारची सुट्टी असल्याने मित्रांसमवेत
भंडारदरा धरणावर पर्यटनासाठी आला होता.
दुपारी बाराच्या सुमारास हे सर्व तरूण एमपीडीसीच्या मागील बाजूने भंडारदरा धरणाच्या जलाशयाचा आनंद घेत होते. त्या पैकी पल्ली हा पाण्यात उतरला. परंतु खोलीचा अंदाज न आल्याने तो धरणात बुडाला. बरोबर असलेल्या त्याच्या मित्रांनी पाण्यात उड्या मारून त्याला वाचवले व त्वरित नाशिक येथे उपचारासाठी हलवले.
परंतु त्याला वाचवण्यात यश आले नाही. पल्ली हा मुळचा दक्षिण भारतीय असून, कामानिमित्त मुंबईला राहत होता. (वार्ताहर)